Ad will apear here
Next
पक्ष्यांसाठी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची


पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात निसर्ग व पर्यावरणाच्या संवर्धनाबद्दल चांगलीच जनजागृती झाली आहे. त्याची प्रचीती सध्या येत आहे ती पक्ष्यांना ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यांवरून. नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी मारलेल्या फेरफटक्यावेळी ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली.


सध्याच्या कडक उन्हाळ्याचा विचार करून जिल्ह्यात ठिकठिकाणच्या नागरिकांनी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी ठेवलेली दिसून येत आहेत. कोणी मातीच्या भांड्यात, तर कोणी प्लास्टिकच्या भांड्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचे पाहायला मिळाले. वर्तमानपत्र, तसेच टीव्ही चॅनेलवरील बातम्या, तसेच सोशल मीडियावरील संदेशांमुळे पर्यावरणाबद्दलच्या जाणिवा थोड्या प्रगल्भ होऊ लागल्या आहेत. वाढत्या उन्हाचा विचार करून पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याचा विचार हा त्याचाच एक परिणाम असावा, असे म्हणण्यास जागा आहे.


रोपळे गावातील शेतकरी पोपट भोसले व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य तर पक्ष्यांना पिण्यासाठी चक्क फिल्टरचे पाणी ठेवतात. हेही विशेषच म्हणावे लागेल. लोकवस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा त्या भागातील वावर वाढला आहे. पक्ष्यांसाठीच्या या पाणपोयांवर आता चिमणी, सनबर्ड, चष्मेवाला, बुलबुल, दयाळ, साळुंखी व टेलर बर्ड आदी पक्ष्यांची गर्दी वाढू लागली आहे. एकंदरीत चित्र सुखावणारे आहे.


‘हा उपक्रम केवळ एका दिवसासाठी नसून तो पावसाळ्यात चांगला पाऊस पडेपर्यंत चालू ठेवणार आहोत,’ असे बाभूळगाव (ता. पंढरपूर) येथील राज्य पुरस्कारप्राप्त निवृत्त मुख्याध्यापक राजाराम वाघमारे यांनी सांगितले. सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी आपापल्या भागांमध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची शक्य तितकी व्यवस्था करावी, असे आवाहनही या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZBLBB
Similar Posts
सरड्याची धाव पाण्यापर्यंत... पंढरपूर : उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भासत असते मात्र सरिसृप वर्गातील प्राण्यांना पाण्याची फारशी गरज भासत नाही. परंतु तापमानाचा पारा खूपच चढू लागल्यामुळे चक्क सरड्यालाही तहान लागल्याने त्याने पाण्याकडे धाव घेतल्याचे पंढरपूर परिसरात आढळून आले आहे. प्राणिशास्त्रातील तज्ज्ञांच्या मते ही दुर्मीळ घटना आहे
‘आम्ही संपात आहोत; पण शेतीमालाची नासाडी पटत नाही’ पंढरपूर : संप किंवा बंद म्हटले, की खळ्ळ-खटॅक ठरलेलेच; मात्र सोलापूरच्या पंढरपूर तालुक्यातील रोपळे बुद्रुक या गावात कोणत्याही शेतमालाची नासाडी न करता शेतकऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस पार पडला. हे शेतकरी संपात सहभागी असले, तरी होता होईल तो शेतीमालाची नासाडी करायची नाही, असा सारासार विचार त्यांनी केला आहे
मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट सोलापूर : मूकबधिर विद्यार्थांना वाचासिद्धीसाठी रोपळे (पंढरपूर) येथील सुप्रभात ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामुहिक श्रवण यंत्र भेट दिले.
...आणि खारट ऊस गोड झाला पंढरपूर : माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थातच शेतीच्या शाश्वततेला महत्त्व आहे. विविध कारणांमुळे आज मातीची सुपीकता घटत चालली असून, अनेक ठिकाणी वाळवंटीकरण होऊ लागले आहे. हा चिंतेचा विषय बनला असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुरूम व गाळमातीचा वापर करून जमीन सुपीक बनवली आहे. वाळवंटीकरणाबद्दलची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language